घरमनोरंजन'अश्रृंची झाली फुले' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द!

‘अश्रृंची झाली फुले’ नाटकाचे पुढील प्रयोग रद्द!

Subscribe

अभिनेता सुबोध भावे याच ‘अश्रृंची झाली फुले’ हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकाचे प्रयोग सध्या महाराष्ट्रभर सुरू आहेत. पण आता यापुढील काही प्रयोगरद्द करण्याचा निर्णय सुबोधने घेतला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती आहे. सांगली, कोल्हापूर भागात पवसाने हाहाकार माजवला आहे. सध्या मोठ्याप्रमाणावर पुरात अडकेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम कोल्हापूरात सुरू आहे. हि सर्व परिस्थिती पाहता सुबोधन नाटकाचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

कोल्हापूर,सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी आजपासून सुरु होणारे "अश्रूंची झाली फुले"चे प्रयोग रद्द करत आहोत. तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य वाटत नाही. आधी तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या,सुरक्षित व्हा. नाटकाचा प्रयोग घेऊन आम्ही परत येऊ. काळजी घ्या मित्रांनो??

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

- Advertisement -

‘कोल्हापूर,सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी आजपासून सुरु होणारे “अश्रूंची झाली फुले”चे प्रयोग रद्द करत आहोत. तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य वाटत नाही. आधी तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या,सुरक्षित व्हा. नाटकाचा प्रयोग घेऊन आम्ही परत येऊ.’ अस म्हणत सुबोधने प्रयोग रद्द करत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर पुन्हा प्रयोग करण्याचे आश्वासनही येथील रसिकांना दिले आहे.

View this post on Instagram

स्थळ- हुतात्मा स्मारक मंदिर(सोलापूर) प्रसंग – अश्रूंची झाली फुले नाटकाचा प्रयोग. घटना – नाटकावर प्रेम करणाऱ्या आणि मनापासून नाटक जगणाऱ्या या खऱ्या रसिक प्रेक्षकांनी आपणहून पुढे येऊन मनापासून केलीली ही कृती. तुमच्या सारख्या रसिकांमुळे आम्हाला नाटक करण्याचं बळ येतं. सोलापूरकर तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आम्हा सर्व नाटक वेड्यांकडून ????? #ashrunchizaliphule #natak #solapur

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

- Advertisement -

‘अश्रृंची झाली फुले’ या नाटकात सुबोध भावे,शैलेश दातार,सीमा देशमुख मुख्य भुमिकेत आहेत. सुबोधने साकारलेला ‘लाल्या’ प्रेक्षकांनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतला आहे. या आधी डॉ.काशीनाथ घाणेकर या चित्रपटातून सुबोध भावेचा ‘लाल्या’ ही प्रेक्षकांना आवडला होता.

नाटकात काम करणारी नाही….

नाटक सुरू असताना जे प्रेक्षक मोबाईल वापरतात, मोबाईलवर बोलतात अशा प्रेक्षकांवर सुबोध संतापला आहे. नाटकादरम्यान जर असेच प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असतील तर यापूढे नाटक करणार नाही असा इशारा त्यांने दिला आहे. सुबोध भावेचे सध्या ‘अश्रृंची झाली फुले’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना सुचना करून देखील मोबाईल फोन वाजतो. त्यामुळे नाटकात व्यत्यय येतो. या सगळ्या प्रकारामुळे सुबोध प्रेक्षकांवर चांगलाच संतापला आहे. आपला संताप त्याने सोशलमिडीयावर पोस्ट लिहून व्यक्त केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -