घरमनोरंजनकाही दिवसांपूर्वीच कोरोना लस घेतली असतानाही आशुतोष राणाला कोरोनाची लागण

काही दिवसांपूर्वीच कोरोना लस घेतली असतानाही आशुतोष राणाला कोरोनाची लागण

Subscribe

सामान्यांपासून जनतेपासून सेलिब्रेटिंपर्यंत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

सध्या देशात कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर कहर वाढतच आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. आता देशपातळीवरही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात सामान्यांपासून जनतेपासून सेलिब्रेटिंपर्यंत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. गेल्या काही महिन्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडतले आहेत. यातच आता दिग्गज अभिनेता आशुतोष राणा याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. आशुतोष राणा याने ६ एप्रिल रोजी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला होता. मात्र तरीही आता त्याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यासंबंधी माहिती त्याने सोशलमीडिआद्वारे दिली आहे. त्याच्या फेसबूक अकाऊंटवरुन त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

ही पोस्ट शेअर करताना, ‘आपले शरीर एका दुर्गासमाना असते, यात नऊ द्वार असतात. याठिकाणी असलेली परमचेतना, रक्षणकरणाऱ्या शक्तीला दुर्गा म्हटले जाते. आज भारतीय नववर्षाची सुरुवात आहे. याला चैत्र नवरात्री असेही म्हटले जाते. आजपासून नऊ दिवस भारतात जगतजननी दुर्गामातेचे पूजन होते. या अत्यंत शुभदिनी तुम्हाला तुमच्या शरीरातील एका विकाराबद्दल माहिती मिळत असेल तर, यासारखे शुभ काहीही नाही. मला आजच कळले आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मी तात्काळ या आजारातून मुक्त होणयाचा प्रयत्न सुरु केलेत. मी लवकरच बरा होईल, असा विश्वास व्यक्त करतो.” असे आशुतोष याने आपल्या पोस्टमधून शेअर केले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.


हे वाचा-  मलायका आणि अर्जून ने गूपचूपच उरकलाय साखरपुडा…… फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -