Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन लसीची वाढती किंमत विचारताच, फरहान अख्तर झाला ट्रोल

लसीची वाढती किंमत विचारताच, फरहान अख्तर झाला ट्रोल

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. महाराष्ट्रामध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच संपूर्णतः भारतीय बनावटीची असलेली लस आता बाजारात लसीकरणसाठी उपलब्ध आहे. सगळीकडेच आता लसीकरणाला वेग आला आहे . १८ वर्षापुढील लोकांना सुद्धा आता लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. तसेच राज्य सरकार देखील लस खरेदी करू शकते असे केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र अभिनेता फरहान अख्तरने लसीकरणाच्या वाढत्या किंमतीवर प्रश्न उपस्थित केलं आहे. फरहान ने ट्विट करत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला प्रश्न विचारात धारेवर धरलं आहे. भारतामध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा कोरना लस इतकी महाग का आहे? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून ट्विट केल आहे. फरहानच्या या ट्विट वर अनेक नेटकर्‍यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकर्‍यांनी फरहान ची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्याला रुग्णालयात दाखल होवून लाखो रुपयांच बिल भरण्यापेक्षा ६०० रुपयात लसीकरण करणे योग्य आहे असं उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खाजगी रुग्णालयात ६०० रुपये किमतीत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता १८ वर्षापुढील व्यक्तीला कोरोना लस खाजगी रुग्णालयात ६०० रुपये किंमतीत तर सरकारी रुग्णालयात ४०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. पण केंद्र सरकारला मात्र कोरोना लस पूर्वीप्रमाणेच १५० रुपयाला मिळणार आहे. फरहान च्या ट्विट नंतर सिरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडिया ने फरहान च्या प्रश्नाचे उत्तर देत स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

 

फरहान सध्या त्याच्या आगामी ‘तूफान’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. गेल्या वर्षी फरहान प्रियांका चोप्रा सोबत द स्काय इज पिंक मध्ये दिसला होता. चाहते फरहान च्या आगामी चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत

 


हे हि वाचा – OTT क्विन रसिका दुग्गलची, या प्रसिद्ध वेब सिरीजच्या पुढील सीझनही लागणार वर्णी

- Advertisement -