घरमनोरंजन'ख्वाबों के परिंदे' मधून उलघडणार जीवाभावाच्या मैत्रीचे पैलू

‘ख्वाबों के परिंदे’ मधून उलघडणार जीवाभावाच्या मैत्रीचे पैलू

Subscribe

आयुष्याचा प्रवास हा अगदी अकल्पनीय, न पाहिलेला आणि अगदी सुख, दु:खांनी भरलेला असतो. या प्रवासादरम्यान अशा काही घटना घडतात ज्याने आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. पण या प्रवासात अनेकदा मित्र मैत्रिणींची मोलाची साथ मिळते आणि आयुष्य पुन्हा नव्याने सुरु होते.अशाच एका जीवाभावाच्या मैत्रीचा प्रवास ‘ख्वाबों के परिंदे’ या वेबसिरिजमधून उलघडणार आहे. आयुष्यात मैत्रीमुळे मिळालेला नवा आशेचा किरण, जीवनाचा पुन्हा नवा शोध घेण्यासाठी एकमेकांचा खरा साथीदार होण्यासाठीचा प्रवास सुरु होतो.  बिंदिया, दीक्षित आणि मेघा हे तिघे मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यातील दु:ख विसरण्यासाठी, नव्या प्रेमाच्या शोध घेण्यासाठी आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतीविरुद्ध लढण्यासाठी मेलबर्न ते पर्थ असा ऑस्ट्रेलियातील रोड ट्रीप सफर करतात.

मेलबर्न विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर, बिंदिया तिच्या दोन विश्वासू मित्र मैत्रिण दीक्षित आणि मेघाला आनंददायक आणि मज्जा-मस्तीपूर्ण अशा मेलबर्न ते पर्थ या रोड ट्रीपला येण्यासाठी मसका मारते. बिंदियासाठी ही ट्रीप म्हणजे सर्वकाही आहे. कारण ट्रीपनंतर भारतात येऊन जबाबदारांची ओझे पलण्यास सज्ज राहण्यापूर्वी आयुष्यात काही क्षण मोकळ्या हवेत, जगात आनंदाने घेलवण्यासाठी तिची ही शेवटची संधी असू शकते. एकांदरीत तीन जीवभावाच्या मैत्रमैत्रीणींच्या आयुष्यातील चढउतार आणि यात एकमेकांची मिळालेली मोलाची साथ यावर भाष्य करणारी ही वेबसिरिज आहे.या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

- Advertisement -

‘ख्वाबो के परिंदे’ या वेबसिरिजच्या माध्यमातून बिंदीयाबरोबर ऑस्ट्रेलियाची सुंदर सफर पाहत मैत्री, आशा आणि आयुष्याचा अद्भुत प्रवास घडणार आहे. ‘ख्वाबो के परिंदे’ ही वेबसिरिज जूनमध्ये फक्त वूट अॅपवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


आता ब्लॅक फंगसवरही पंतजलीचे औषध बाजारात येणार, रामदेव बाबांचा नवा दावा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -