53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशा पारेख यांनी वेस्टर्न कल्चरबाबत व्यक्त केलं दुःख

60-70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख नुकत्याच गोव्या येथे आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांना त्यांच्या काळातील चित्रपटाचे शूटिंग करताना येणाऱ्या अनेक अडचणींबद्दल सांगितले. तसेच त्यांनी यावेळी भारतीय लग्नांमध्ये स्त्रिया वेस्टर्न कपडे परिधान करतात. याबाबत देखील प्रश्न उपस्थित केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 53 व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’मध्ये आजकाल लग्नांमध्ये स्त्रिया वेस्टर्न कपडे परिधान करतात याबाबत आशा पारेख म्हणाल्या की, “ज्याप्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. मला नाही माहित, परंतु आपण खूप वेस्टर्न कल्चरमध्ये जात आहोत. गाउन घालून मुली लग्नामध्ये जातात. आपला घाघरा-चोळी,साडी आणि सल्वार-कमीज आहे. ते घाला ना”

वेस्टर्न कल्चरबाबत आशा पारेख यांनी व्यक्त केलं दुःख
वेस्टर्न कल्चरबाबत दुःख व्यक्त करत आशा पारेख म्हणाल्या की, “आपण ते सर्व का नाही घालत. ते स्क्रीनवर अभिनेत्रींना बघतात आणि त्यांच्यासारखेच कपडे घालतात. आपण जाड असू किंवा कसेही असू आपण तेच कपडे घालणार. आपली एवढी चांगली संस्कृती, नृत्य आणि संगीत आहे की याला पॉप संस्कृतीमध्ये देखील परत आणलं जाऊ शकतं.”

आशा पारेश यांनी बाल कलाकार म्हणून केली होती सुरुवात
आशा पारेख यांनी 1952 मध्ये ‘मां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यासोबतच त्यांनी आसमान, धोबी डॉक्टर, श्री चैतन्य महाप्रभू, बाप बेटी यांसारख्या चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी 1959 मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.


हेही वाचा :

ब्लॉगमधून अमिताभ यांनी विक्रम गोखले आणि तबस्सुमच्या आठवणींना दिला उजाळा