Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन वयाच्या १५ व्या वर्षीच कोट्यावधींची मालकीण असलेल्या 'या' अभिनेत्रीचं प्लास्टिक सर्जरीमुळे करिअर...

वयाच्या १५ व्या वर्षीच कोट्यावधींची मालकीण असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं प्लास्टिक सर्जरीमुळे करिअर संपले

आयशाने बॉलिवूडबरोबरच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपला अभिनयाची झलक दाखवली आहे. आयशा आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Related Story

- Advertisement -

एकेकाळी बॉलिवू़डमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीपैकी एक म्हणजे आयशा टाकिया ही अभिनेत्री होती. आपल्या सौदर्याने आणि मादक अदांनी आयशाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आयशाने बॉलिवूडबरोबरच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपला अभिनयाची झलक दाखवली आहे. आयशा आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आयशा अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. मात्र चंदेरी दुनियेपासून लांब असली तरी ती कधीकाळी तरुणाईच्या गळ्यातील ताईत होती. २००४ मध्ये तिचा सर्वात पहिला चित्रपट टार्झन- द वॉंडर कार प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर पाठशाला, क्या लव्ह स्टोरी है, होम डिलिव्हरी, शादी से पेहले, असे अनेक सिनेमे करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली होती. तिचा वॉन्टेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. मात्र अचानक या कारणाने तिच्या करिअरला अधोगती आली. आयशाने प्लास्टिक सर्जरी केली. आणि तिने केलेल्या या सर्जरीमुळे तिच्या करिअरला अधोगती आली. आयशाला लहानपणापासूनच बॉलिवूडचे प्रचंड आकर्षण होते. शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत तिने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती.

विशेष म्हणजे केवळ वयाच्या पंधराव्या वर्षीच तिला एका जॅकेट तयार करणाऱ्या आंतराष्ट्रीय कंपनीसाठी मॉडलिंग करण्याची ऑफर मिळाली होती. या कामासाठी तिला तब्बल १ कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. यानंतर तिला अनेक चित्रपटांत काम करण्याची संधी मिळत गेली. आयशाचे चित्रपट तिकिटबारीवर जास्त कमाल करत नव्हते मात्र तरीही तिला कोट्यवधींचे मानधन मिळत होते. याच काळात आयशाने अधिक सुंदर दिसण्यासाठी नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र यामुळे तिचा चेहरा विचित्र दिसू लागला त्यानंतर झालेली चूक सुधारण्यासाठी तिने होटांची सर्जरी केली. त्यानंतर एकामागून एक अनेक ब्यूटी सर्जरी केली. प्रत्येक सर्जरीनंतर तिचे सौदर्य कमी होत गेले. परिणामी एक अशी वेळ आली जेव्हा प्रेक्षक तिला चेटकीण म्हणून चिडवू लागले. प्रेक्षकांच्या या नकारात्मक प्रक्रियेमुळे अखेल आयशाला चित्रपट मिळणे थांबले. आता ती बॉलिवूड आणि मॉडलिंगपासून दूर आपल्या पतीसोबत दुबईमध्ये राहत आहे.


- Advertisement -

हे वाचा-                                                                                                                                                                                                          बॅक टू स्कुल’ सिनेमाच्या निमित्ताने निशिगंधा वाड पुन्हा मोठ्या पडदयावर

- Advertisement -