करिअरच्या सुरुवातीलाच निर्मात्यांनी माझ्या अंगावर कुत्रे सोडले; रणवीर सिंगने सांगितला कटू अनुभव

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याच्या बॉलिवूडमधील करिअरला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. मागील 12 वर्षात प्रचंड मेहनत करुन रणवीरने अभिनेता म्हणून फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात स्वतःची ओळख तयार केली आहे. आज रणवीर सिंहचे लाखो चाहते आहेत. मात्र, एकेकाळी याचं रणवीरला चित्रपटामध्ये काम करताना अनेक कष्ट करावे लागले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीरने त्याच्या करिअरमधील कटू अनुभव सांगितले.

निर्मात्यांनी रणवीरच्या पाठी सोडले कुत्रे

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीरला Etoile d’Or या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. यादरम्यान, त्याने त्याच्या बॉलिवूडमधील आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं. आपल्या करिअरमध्ये घेतलेल्या संघर्षाबद्दल सांगताना तो म्हणाला की, “एकदा मी एका प्रसिद्ध निर्मात्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी पार्टी सुरु होती. त्यावेळी रणवीरने चित्रपटात तो काम शोधत असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्या निर्मात्यांनी रणवीर सिंहच्या पाठीमागे पाळीव कुत्रे सोडले होते. त्यानंतर रणवीर म्हणाला की, हे त्यांनी त्यावेळी फक्त मजा म्हणून केलं होतं. रणवीर त्या निर्मात्यांचे नाव नाही सांगितले. परंतु तो म्हणाला की, त्यांनी परत त्याला त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं”.

त्यानंतर रणवीर सिंह म्हणाला की, करिअरच्या सुरुवातील एकदा एका माणूस मला विचित्र ठिकाणी घेऊन गेला आणि मला म्हणाला की तू हार्ड वर्कवर विश्वास ठेवतोस की, स्मार्ट वर्कवर त्यावर रणवीर म्हणाला की, मला नाही वाटतं मी स्मार्ट आहे परंतु मला हे नक्कीच ठाऊक आहे की मी हार्डवर्किंग आहे.

 


हेही वाचा :

प्रियंका चोप्रा आणि रुही दोसानीने केला ‘झूम झूम बाबा’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल