मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीरचा मल्हारी गाण्यावरील डान्स पाहून प्रेक्षकही थिरकले

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या उत्तम अभिनयाचे आणि अतरंगी स्वभावाचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, नुकतच रणवीरला मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इटोअल डीओर हा अवॉर्ड देऊन स्मानित करण्यात आलं. याआधी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान, अमीर खानला यांनी देखील हा अवॉर्ड पटकावलेला आहे.

दरम्यान, या फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीर सिंह त्याच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील मल्हारी गाण्यावर डांस करत दमदार एन्ट्री केली. यावेळी सर्वांचे लक्ष फक्त रणवीर सिंहवरच. होते. रणवीरला पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेक प्रेक्षकांनी देखील ठेका धरला. तसेच यावेळी रणवीरने स्वतःला एक वाईट गायक असल्याचं म्हटलं. हे सांगताना तो म्हणाला की, “मी जगातील एक वाईट गायक आहे. तुम्हाला ठाऊक आहे, माझी प्रिय सुसान, जी मला एवढ्या वर्षांपासून ओळखते. प्रत्येकवेळी जेव्हा मी सुसानला मला गाणं गायचं आहे असं म्हणतो त्यावेळी ती स्वतःचे कान बंद करुन घेते. ती म्हणते, रणवीर तू अशा भ्रमात आहेस की तूला खूप छान गाता येतं. पण खरी गोष्ट अशी आहे की, तुला फक्त रॅप साँग्सच गायला हवे आणि फक्त डान्स करायला हवा. रणवीर पुढे म्हणाला की, मला माझ्या डान्सवर पूर्ण विश्वास आहे.”

तसेच अफ्रिकेमध्ये भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधित्व करत रणवीर म्हणाला की, “मला वाटंत की, भारतीय चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटत आहे.”

या चित्रपटांमध्ये झळकणार रणवीर
रणवीर सिंहचा मागील काही दिवसांपूर्वी ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट रिलीज झाला होता. याशिवाय रणवीर येत्या काळात करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.

 


हेही वाचा :

बॉडी-बिल्डिंगचा वेडेपणा… सिद्धांत सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट