2023 मध्ये आथिया शेट्टी आणि केएल राहुल करणार लग्न? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहूल यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. दोघेही मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता अनेकांचे त्यांच्या लग्नाकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार, आथिया आणि राहूल 2023 मध्ये लग्न करु शकतात. याबाबत स्वतः आथिचे वडील सुनील शेट्टीने खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

सुनील शेट्टी त्याच्या आगामी ‘धारावी बँक’ वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी गेला असताना तेथील मुलाखतीमध्ये त्याला आथियाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले. या मुलाखतीत त्याने सांगितलं की, “त्यांचे लग्न लवकरच होईल”. त्यानंतर आता 2023 पर्यंत दोघांचे लग्न होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

सुरु आहे लग्नाची तयारी
सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी राहुलच्या घरच्यांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या घरच्यांची भेट घेतली होती. अथिया आणि राहुल आपल्या कुटुंबियांसोबत आपलं नवीन घर सुद्धा पाहायला गेले होते. जिथे ते लग्नानंतर राहणार आहेत. तसेच त्यांचे लग्न मुंबईमध्येच होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

फिल्मफेअर अचिव्हर्स अवॉर्डमध्ये गोविंदाचा डान्स पाहून रणवीरही थिरकला