घरमनोरंजनआथियाच्या डायमंड मंगळसूत्राने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

आथियाच्या डायमंड मंगळसूत्राने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल 23 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळामधील फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला होता. दोघांच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार असे मोजके पाहुणे हजर होते. फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. लग्न झाल्यापासून या जोडप्याच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, लग्नाच्या फोटोंनंतर आथिया आणि केएल राहूलच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार अश्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघं लग्नबंधनात अडकले. लग्न झाल्यापासून या जोडप्याच्या लग्नातील मेहंदीचे, हळद आणि संगीतचे अनेक फोटो समोर आले. दरम्यान, आता लग्नानंतर झालेल्या पार्टीचा एक छोटा व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये आथिया आणि केएल राहूल वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत.

- Advertisement -

आथियाच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

केएल राहुलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघंही वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. यात केएल राहूलने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर आथियाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून गळ्यात डायमंड मंगळसूत्र परिधान केल आहे. आथियाच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या लूकमध्ये आथिया खूप सुंदर दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आथिया आणि केएल राहुल गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.

 


हेही वाचा :

मी तर कपड्यांमुळेच प्रसिद्ध…; कंगनाच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्फीची प्रतिक्रिया

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -