अरे बापरे! आथियाच्या भरजरी लेहंग्यासाठी लागले 10,000 तास!

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर काल (सोमवार) विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळामधील फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार असे मोजके पाहुणे हजर होते. फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. या जोडप्याच्या लग्नातील काही खास फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर होतेय आथियाच्या लेहंग्याची चर्चा


first pictures of kl rahul and athiya shettys wedding are out

आथिला आणि केएल राहूलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे परंतु लग्नासोबत आथियाच्या डिझाइनर लेहग्यांची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अथिया शेट्टीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला पीच रंगाचा लेंहगा, चोली सेट परिधान केला होता, या लेहंग्याला तयार करण्यासाठी 1-2 नव्हे तर तब्बल दहा हजार तास लागले होते. तर राहुलने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती.

सुनील शेट्टीचा पारंपारिक पोशाख देखील चर्चेत

आथियासोबतच दुसरीकडे सुनील शेट्टीच्या लग्नात घातलेल्या कपड्यांची चर्चा रंगली आहे. यावेळी सुनील शेट्टीने दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख परिधान केला होता. त्याने साधा कुर्ता आणि लुंगी घातली होती. तसेच गळ्यात माळ आणि पायात कोल्हापूरी चप्पल घातली होती. सुनील शेट्टीच्या या पारंपारिक पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधले. अनेकजण त्याच्या पेहरावाचे कौतुक करत आहेत.


हेही वाचा :

लेकीच्या लग्नात पारंपरिक पोशाखात दिसला सुनील शेट्टी