जेव्हा विनाश हा तमाशा असल्यासारखा साजरा केला जातो…अतुल कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

‘लाल सिंह चड्ढा’ हॉलिवूड फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला. तसेच आमीर खान देखील 4 वर्षानंतर पुन्हा चित्रपटांमझ्ये झळकणार होता. मात्र या तरीही चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली नाही.

अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच आमीरचा ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित झाला परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. आमीरच्या चित्रपटाला सोशल मीडिया प्रचंड प्रमाणात ट्रोल देखील केलं जात आहे, शिवाय चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील चित्रपट पाहण्यासाठी नापसंती दर्शवली आहे. दरम्यान, यासंदर्भात मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीची एक पोस्ट सध्या समोर आली आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ हॉलिवूड फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला. तसेच आमीर खान देखील 4 वर्षानंतर पुन्हा चित्रपटांमझ्ये झळकणार होता.

मात्र, या तरीही चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली नाही. यासंदर्भात अभिनेता अतुल कुलकर्णीने एक पोस्ट शेअर करत लिहिलंय की, ‘जेव्हा विनाश हा तमाशा असल्यासारखा साजरा केला जातो, तेव्हा कटू सत्य ढिगाऱ्यात बदलते.’

खरंतर, समजाचा एक गट असा देखील असतो जो सोशल मीडियावर ‘लाल सिंह चड्ढा’च्या फ्लॉप होण्याची वाट पाहत होते. हे तेच लोक आहेत, ज्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येताच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होता.

आमीर खानचे 100 कोटींहून अधिक नुकसान

एका अहवालात नमूद केले आहे की आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला 100 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, हा चित्रपट बनविण्यासाठी 180 कोटी एवढे बजेट होते. पण त्या तुलनेत हा चित्रपट तेवढी कमाई करू शकला नाही. बॉलिवूड मधील सलमान खान शाहरुख खान यांच्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी आमिर खानचा ‘लाल सिंघ चड्ढा’ हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला.


हेही वाचा : आमीर खानच्या चित्रपटाची इतकी वाईट अवस्था… ‘लाल सिंह चड्ढा’बाबत राम गोपाल यांनी मांडलं मत