मुंबई : अभिनेता आणि गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील बंगल्याचा होणारा लिलाव थांबवण्यात आला आहे. यासंदर्भात बँक ऑफ बडोदाने आज एक निवेदन काढले आहे. या निवेदनात बँक ऑफ बडोदाने म्हटले की, तांत्रिक बिघाडामुळे बंगल्याचा लिलाव थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे. यामुळे सनी देओलला बँक ऑफ बडोदाकडून मोठा दिसाला मिळाला आहे.
बँक ऑफ बडोदाने सनी देओलला 56 कोटींच्या थकबाकीसंदर्भात नोटीस पाठविली होती. यामुळे बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात देखील काढली होती. पण बँकने जाहिरात काढल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवला.
हेही वाचा – ‘गदर 2’ला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल धर्मेंद्र यांनी मानले आभार
नेमके काय आहे प्रकरण
सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून 55.99 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड सनी देओलने अद्याप केलेली नाही. यामुळे बँकेने कर्ज वसुल करण्यासाठी सनी देओलचा बंगलाच लिलावाची नोटीस बजावली होती. यासंदर्भात बँकेने लिलावाची किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेने काढलेल्या जाहिरातीत म्हटले की, अजय सिंग देओलच्या ‘सनी व्हिला’ या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबरला होणार आहे. सनी देओलचा बंगला हा जुहूच्या गांधी ग्राम रोडवर असून या बंगल्यात सुपर साउंड नावाचा रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओ चालविला जातो. या बंगल्यात चित्रपटगृह, पूल, हेलिपॅड एरिया आणि गार्डन सर्व सुविधा आहेत.
हेही वाचा – मी तारा सिंगचा फॅनबॉय… कार्तिक आर्यनने ‘गदर 2’चं केलं कौतुक
गरद 2 ची जोरदार कमाई
सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित झाला असून गदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑपिसवर चांगली कमाई करत आहे. गदर 2 ने आतापर्यंत 335 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यामुळे किंग खान ऑफ बॉलिवूड शाहरुख खान यांचा ‘पठाण’ हा चित्रपटाला टक्कर देत आहे.