घर मनोरंजन विजय आणि अनन्याच्या 'लायगर' चित्रपटाला प्रेक्षकांची पाठ

विजय आणि अनन्याच्या ‘लायगर’ चित्रपटाला प्रेक्षकांची पाठ

Subscribe

इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. तसेच चित्रपटाला रिव्यू मिळत नसल्याने चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल की नाही याची शाश्वती देता नाही.

टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट नुकत्याच काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला. परंतु इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. तसेच चित्रपटाला रिव्यू मिळत नसल्याने चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल की नाही याची शाश्वती देता नाही. हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 2-3 ते दिवसात फक्त 5.75 कोटींची कमाई केलेली आहे.

‘लायगर’ला सुद्धा प्रेक्षकांची नापसंती
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या ‘लायगर’ चित्रपटाला हिंदी आणि टॉलिवूडमधील भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 3-4 दिवस होऊनही चित्रपटाची कमाई फारशी झालेली दिसून येत नाही. या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर गुरूवारी 1.25 कोटी आणि शुक्रवारी 4.50 कोटी तर शनिवारी 4.15 कोटी इतकी कमाई केलेली आहे. दरम्यान, अजून रविवारची कमाई समोर आलेली नाही. परंतु चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहून चित्रपटातील कलाकार आणि निर्माते निराश झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

- Advertisement -

‘लायगर’ चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले असून विजय देवरकोंडा या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत असून अनन्या पांडे टॉलिवूड पदार्पण करत आहे. या चित्रपटाध्ये विजय, अनन्या व्यतिरिक्त रोनित रॉय, मकरंद देशपांडे आणि राम्या कृष्षन महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

 


हेही वाचा : बॉलिवूड गाण्यावर प्रियांकाच्या मुलीचा डान्स; शेअर केला सुंदर व्हिडीओ

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -