‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाला प्रेक्षकांची ना पसंती; ३० टक्के शो कॅन्सल

रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. मात्र पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त ३.२५ करोडची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर, पोस्टर आणि गाण्यांना सुद्धा प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिनेता कमाल आर खानने ‘आपत्ती’ असं म्हटले होते.

जयेशभाई जोरदारबाबत अभिनेता कमाल आर खानने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतोय की, “जयेशभाई जोरदार चित्रपटाचे ३० टक्के शो कॅन्सल करण्यात आले आहेत. कारण जर प्रेक्षकंच सिनेमा पहायला आले नाही. म्हणजे सिनेमा दुसऱ्याच दिवशी फ्लॉप ठरला” केआरच्या या ट्विटवर सोशल मीडियावरील युजर्सने प्रतिक्रिया दिल्या. मात्र काही जण केआरचे समर्थन करत आहेत, तर काही केआरच्या ट्विटवर टिका करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाची कथा कन्या भ्रूण हत्या या सामाजिक विषयावर आधारित आहे. चित्रपटामध्ये ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ असा उत्तम सामाजिक विषय मांडण्यात आला आहे. मात्र हा चित्रपट पाहणाऱ्या काही प्रेक्षकांच्या मते, या दाखवलेल्या सामाजिक गंभीर विषयाचा बाजार मांडून हसं करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या कथानकावरुन दिग्दर्शक दिव्यांग ठक्करवर टिका केली जात आहे, सगळे मुद्दे एकत्र दाखवण्याच्या नादात कथा फसल्याचं लोक म्हणत आहेत. ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशीच लीक झाला म्हणून देखील त्याच्या बॉक्सऑफिस कलेक्शनला फटका बसल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा :‘धर्मवीर’ची पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटींची कमाई