Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन भारतामध्ये ‘अवतार 2’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक; 4 लाखांपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग

भारतामध्ये ‘अवतार 2’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक; 4 लाखांपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Subscribe

हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारतामध्ये या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी 5 दिवस बाकी असताना अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये 4 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली असून 2022 मधील चित्रपटांपैकी या चित्रपटाने सर्वात जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग रेकॉर्ड पटकावला आहे. हा चित्रपट यंदाच्या हॉलिवूड चित्रपटांना देखील मागे टाकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Avatar: The Way Of Water Box Office (Advance Booking): 15,000 Tickets Sold In Just 3 Days & James Cameron Directorial Is Looking To Create History!

- Advertisement -

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून सध्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. हा चित्रपट भारतामध्ये हिंदी, इंग्लिश, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची भारतामध्ये जवळपास 4 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. या तिकीटांद्वारे कोटींची कमाई करण्यात आली आहे. भारतात हा चित्रपट नक्कीच 50 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’

- Advertisement -

Avatar: The Way of Water: release date, trailer, and more | TechRadarदिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाचा आता दुसरा सिक्वेल येणार आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

 


हेही वाचा :

प्रकाश राजने उडवली शिवाजी महाराजांच्या लूकमधील अक्षय कुमारची खिल्ली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -