आलियाच्या ‘डार्लिंग्स’वर प्रेक्षक संतापले, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी

अनेक लोक या चित्रपटाच्या कंसेप्टवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही लोकांच्या मते, आलिया ने या चित्रपटामध्ये फक्त अभिनयचं नाही तर या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

नुकत्याच काही दिवसांपासून आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाला बॉय कॉट करण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता आलिया भट्टच्या आगामी ‘डार्लिंग्स’ला देखील प्रेक्षकांचा विरोध होत आहे. आलिया भट्ट, शेफाली शाह आणि विजय वर्मा यांचा ‘डार्लिंग्स’ 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

आलियाच्या ‘डार्लिंग्स’ला का होतोय विरोध?
मागील काही दिवसांपासून आलियाच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपट चांगलाचं चर्चेत आहे. आलिया या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे देखील खूप कौतुक केलं जात होतं. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी या चित्रपटाला सोशल मीडियावर विरोध होत आहे. याचं कारण म्हणजे लोकांच्या मते, या चित्रपटामध्ये एका पुरूषासोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला डार्क कॉमेडी म्हणून दाखवण्यात आलं आहे.

अनेक लोक या चित्रपटाच्या कंसेप्टवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही लोकांच्या मते, आलिया ने या चित्रपटामध्ये फक्त अभिनयचं नाही तर या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. प्रेक्षकांच्या मते, आलियाच्या या चित्रपटामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली फक्त पुरूषांवर कौटुंबिक हिंसाचाराला दाखवण्यात आला आहे.

याचं कारणामुळे सोशल मीडियावरील युजर्स संतापले असून या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते गौरव वर्मा, आलिया भट्ट आणि गौरी खान आहे. ‘डार्लिंग्स’च्या माध्यामातून आलिया ओटीटीवर पदार्पण करत आहे.

 


हेही वाचा :अभिजीत खांडकेकरचे ओटीटीवर पदार्पण