घरमनोरंजन'RRR' मधील 'नाचो-नाचो' गाण्यावर अमेरिकेतील प्रेक्षकही थिरकले; व्हिडीओ व्हायरल

‘RRR’ मधील ‘नाचो-नाचो’ गाण्यावर अमेरिकेतील प्रेक्षकही थिरकले; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नुकताच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमेरिकेतील चित्रपटगृहात प्रेक्षक 'RRR' मधील नाचो-नाचो गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

साउथचा सुपरस्टार राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर यांच्या RRR चित्रपटाची भुरळ आजही प्रेक्षकांना आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही करोडो रूपयांचा गल्ला जमावला होता. चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली होती. इतकचं नव्हे तर ‘RRR’ ने फक्त भारतीयांनाच नाही तर परदेशातील प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. नुकताच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमेरिकेतील चित्रपटगृहात प्रेक्षक ‘RRR’ मधील नाचो-नाचो गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर यांचा ‘RRR’ चित्रपट 2022 मधील दुसरा टॉप चित्रपट आहे. या चित्रपटाने देशभरातून जवळपास 1175 कोटींची कमाई केली होती. तसेच ‘केजीएफ 2’ देशभरातून 1250 कोटींची कमाई केली.

- Advertisement -

जपानमध्ये देखील प्रदर्शित होणार RRR

टॉलिवूडमधील हा चित्रपट आता अमेरिकेनंतर जपानमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला निर्माते 21 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये प्रदर्शित करणार आहेत.

- Advertisement -

RRR नंतर राजामौलीचा नवा चित्रपट

तेलुगू चित्रपट निर्माते राजामौली आता RRR सारख्या जबरदस्त चित्रपटानंतर नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करत आहेत. राजामौलींच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता महेश बाबू मुख्य भूमिकेत असणार आहे. 2023 पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल.


हेही वाचा :

‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार रश्मिका मंदाना?

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -