घरताज्या घडामोडी'जयंती' महिन्याच्या अंतिम पर्यंत गाजली

‘जयंती’ महिन्याच्या अंतिम पर्यंत गाजली

Subscribe

बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांची मराठी चित्रपटांना पसंती

अठरा महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आता जगभरात सर्व गोष्टी पूर्ववत आल्या असून मनोरंजनसृष्टीदेखील सावरत आहे. महाराष्ट्रात याचे काहीसे वेगळे पण सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे कारण प्रेक्षकांची हिंदी भाषिक किंवा “बॉलिवूड” पेक्षा मराठी चित्रपटांना जास्त गर्दी करताहेत. यामध्ये दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” या सिनेमाचे नाव सर्वात पहिल्यांदा येतं.

जयंती हा सिनेमा दिनांक १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चित्रपट विश्लेषकांसहित वेगवेगळ्या स्तरांवरील मान्यवर तसेच सामान्य जनतेकडून भरभरून प्रेम मिळत आहे. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या पहिल्या चित्रपटाने आता महिन्याच्या चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे . महाराष्ट्रात, विशेषतः म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अगदी डोक्यावर घेतला आहे. नागपूरच्या चित्रपटगृहात सकाळच्या ७ वाजताचा शो असो किंवा रात्री ११. ३० चा, प्रेक्षकांनी हे थिएटर सध्या भरलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिथे मराठी चित्रपट कमी प्रमाणात लागतात तिथे आणि मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरातदेखील “जयंती” चे शो यशस्वीपणे चालू आहेत.

- Advertisement -

मागील आठवड्यात या सिनेमाचे शो आंतरराष्ट्रीय थिएटरला झाले असून ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांकडून सिनेमाचे कौतुक होत आहेत. आगामी काळात इंग्लंड, कॅनडा आणि दुबई या देशातील सिनेमघरात जयंती हा सिनेमा दाखवला जाणार आहे. प्रेक्षकवर्ग खऱ्या अर्थाने जगभरात जयंती साजरी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात जयंती सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे सांगतात, “मागील आठवड्यात आम्हाला थिएटर कमी मिळत असल्यामुळे खंत होती परंतु आता जेव्हा हा सिनेमा राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजत आहे हे पाहताना अतिशय आनंद होत आहे. चित्रपटाचा विषय लोकांना आवडत आहे यातच आमचं यश आहे असे मी मानतो.”


हेही वाचा – Free Hit danka : ‘फ्री हिट दणक्या’ने होणार सगळ्यांचीच ‘दांडी गुल’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -