Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन बॉलीवूडसाठी ऑगस्ट महिना ठरला ऐतिहासिक; केली 'इतक्या' कोटींची कमाई

बॉलीवूडसाठी ऑगस्ट महिना ठरला ऐतिहासिक; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Subscribe

नवी दिल्ली : चित्रपटांवर बहिष्कार, वाद आणि साऊथ चित्रपटांचा जबरदस्त व्यवसाय या कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्री चर्चेत होती. कोविड-19 साथीच्या काळात चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होती. नंतर चित्रपटगृहे सुरू झाली पण कित्येक महिने केवळ अर्ध्या क्षमतेवर चालवण्यात येत होती. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यातच अक्षय कुमारच्या बेल बॉटम चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला होता. पण त्यानंतरही बॉलिवूडमध्ये मंदीचे सत्र सुरूच होते. त्यामुळे हा मंदीचा काळ कधी संपणार याकडे बॉलिवूड दिग्दर्शकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, यंदाचा ऑगस्ट महिन्याने बॉलिवूडला मंदीतून सावरले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक मजबूत कमाई करून दिली आहे. (August was a historic month for Bollywood Earned so many crores)

हेही वाचा – यशराजच्या आगामी चित्रपटामध्ये विकी कौशल

- Advertisement -

शाहरुख खानच्या पठाण या कमबॅक चित्रपटाने जानेवारीमध्ये बॉलिवूडसाठी कमाई करण्याची दारे उघडी करून दिली. पठाण सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, याशिवाय पहिल्या 6 महिन्यात ‘द केरळ स्टोरी’, ‘तू झुठी में मक्कर’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ आणि ‘1920’ सारखे हिट बॉलिवूडला मिळाले आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे मोठ्या बजेटच्या चित्रपटांसह मध्यम आणि लहान बजेटच्या चित्रपटानीही चांगली कमाई केली आहे. आता ऑगस्ट महिना बॉलिवूडच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणार महिना ठरणार आहे.

‘गदर 2’मुळे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कमाई

सनी देओल याचा ऑल-टाइम ब्लॉकबस्टर ‘गदर’ (2001) चा सिक्वेल 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 22 वर्षानंतर प्रदर्शित झालेला ‘गदर 2’ चित्रपट चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा सर्वांनी होती. त्यानुसार 21 दिवसांत या चित्रपटाने आतापर्यंत 470 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ‘गदर 2’ ला पठाण चित्रपटापेक्षा कमी स्क्रीन्स मिळाल्या होत्या. पण या चित्रपटाने इतकी कमाई केली की, तो आता पठाण आणि बाहुबली 2 ला टक्कर देताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दाक्षिणात्य ‘स्कंदा’ चित्रपटात अजय पूरकर साकारणार खलनायक

‘गदर 2’ सह इतर चित्रपटांनीही केली चांगली कमाई

‘गदर 2’सोबत प्रदर्शित झालेल्या ‘OMG 2’ ने 18 दिवसांत 137 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत या चित्रपटाचे नेट कलेक्शन 140 कोटींच्या आसपास आहे. याशिवाय गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटानेही चांगला व्यवसाय केला आहे. ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांनी महिन्याच्या अखेरीपर्यंत बॉक्स ऑफिसवर 675 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

- Advertisment -