घरताज्या घडामोडीRanbir Alia Wedding: लायकी कळाली ना, KRKने आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडची उडवली खिल्ली

Ranbir Alia Wedding: लायकी कळाली ना, KRKने आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडची उडवली खिल्ली

Subscribe

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांच्या लग्नाची जितकी जोरदार चर्चा सुरू आहे, त्याप्रमाणे त्यांच्या भूतकाळाचीही चर्चा सुरू आहे. रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्स आणि आलियाच्या एक्स बॉयफ्रेंड्सबद्दल बोलले जात आहे. अशात नेहमीच चर्चेत असणाऱ्या कमाल आर खान ऊर्फ केआरकेने आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राची ट्वीट करून खिल्ली उडवली आहे.

केआरके काय म्हणाला?

केआरकेने आलिया भट्टच्या लग्नानिमित्ताने तिचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रावर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर केआरकेने सिद्धार्थला धोबी का कुत्ता म्हटले आहे. केआरकेने ट्वीटमध्ये लिहिलेय की, ‘एकेकाळी सिद्धार्थ मल्होत्राने आलिया भट्टसाठी माझ्याशी भांडण केले होते. आता आलियाने तिच्या लग्नात त्याला बोलावले आहे. तुला तुझी लायकी कळाली ना. धोबी का कुत्ता घर का न घाट का.’

- Advertisement -

माध्यमांच्या वृत्तानुसार, करण जोहरचा ‘स्टूडंट ऑफ द ईअर’ चित्रपटादरम्यान आलिया आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. परंतु आलिया आणि सिद्धार्थचे रिलेशनशिप जास्त काळ टीकले नाही. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी आपापले मार्ग वेगवेगळे केले. मग सिद्धार्थ मल्होत्रा कियारा आडवाणीसोबत रिलेशनशिपमध्ये आला. तर आलिया भट्टने रणबीर कपूला डेट करायला सुरुवात केली.

- Advertisement -

आज रणबीर आणि आलिया लग्नबंधनात अडकून नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आज सकाळपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्याच्या विधीला सुरुवात झाली आहे. रणबीर आणि आलियाचे कुटुंबिय या शाही लग्नसोहळ्याला पोहोचले आहेत. आज दुपारी २ किंवा ३ वाजता रणबीर आलिया सात फेरे घेणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


हेही वाचा – Ranbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात फेरे


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -