घरमनोरंजन'अवतार 2' ठरला जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट

‘अवतार 2’ ठरला जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट

Subscribe

हॉलिवूडचा बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला असून जवळपास महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जादू कायम आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. अजूनही प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 471 कोटींची कमाई केली आहे.

‘अवतार 2’ ठरला जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट सहावा चित्रपट

- Advertisement -


जगभरातील टॉप चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर 2009 प्रदर्शित झालेला ‘अवतार’ चित्रपट आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 2.9 बिलियन डॉलर कमाई केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘एवेंजर्स एंडगेम’ चित्रपटाने 2.7 बिलियन डॉलर कमावले होते. तिसऱ्या क्रमांकावर ‘टायटॅनिक’ चित्रपट आहे ज्याने 2.1 बिलियन डॉलर कमावले होते. तर चौथ्या स्थानावर 2.069 बिलियन डॉलर कमावणारा ‘स्टार वार्स- द फोर्स अवेकंस’ चित्रपट आहे. पाचव्या क्रमांकावर ‘एवेंजर्स इनफिनिटी वॉर’ चित्रपट आहे ज्याने 2.048 बिलियन डॉलर कमावले होते. तर सहाव्या क्रमांकावर महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’हा चित्रपट आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरातून एकूण 1.9 बिलियन डॉलर कमावले आहेत.

भारतात 6 भाषांमध्ये झाला प्रदर्शित
हा चित्रपट भारतामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलूगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

- Advertisement -

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

 


हेही वाचा :

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -