Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन प्रतिक्षा संपली! 'अवतार 2' 'या' दिवशी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

प्रतिक्षा संपली! ‘अवतार 2’ ‘या’ दिवशी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Subscribe

16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. शिवाय या चित्रपटाने व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार 2023 चा पुरस्कार देखील जिंकला आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची OTT वर वाट पाहत होते. अशातच लवकरच हा OTT वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ OTT वर कधी होणार प्रदर्शित

 

View this post on Instagram

 

A post shared by Avatar (@avatar)

सध्या अनेक प्रेक्षकांचा कल OTT कडे जास्त प्रमाणात वाढला आहे. चित्रपटगृहात न पाहता आलेले चित्रपट प्रेक्षक OTT वर पाहतात. 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली. तेव्हापासून अनेक प्रेक्षक हा चित्रपट OTT वर पाहण्यासाठी उत्सुक होते. अशातच अवतारच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या OTT वरील प्रदर्शनाची माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट 28 मार्च रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

‘अवतार 2’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल?

- Advertisement -

‘अवतार 2’ पाहण्यासाठी अॅमेझोन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ते विकत घेऊन पाहावे लागेल. हा चित्रपट डॉल्बी अॅटमॉस ऑडिओसह 4K अल्ट्रा HD क्वालिटीमध्ये उपलब्ध असेल.

‘अवतार 2’ ची बॉक्स ऑफिसवरील कमाई

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट तब्बल 250 दशलक्ष डॉलर्सच्या रकमेवर बनवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने जगभरात एकूण 1.7 बिलियन पेक्षा जास्त कमाई केली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेले “बोक्या सातबंडे” लवकरच येणार रंगभूमीवर

- Advertisment -