घरमनोरंजन'अवतार: द वे ऑफ वॉटर' चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ बहुचर्चित चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. हा चित्रपट जवळपास एक दशक आधी रिलीज झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, आता नुकतेच या चित्रपटाचे धमाकेदार टीझर रिलीज झाले आहे. हा टीझर इतका जबरदस्त आहे की, त्यातील एक-एक विज्युअलवर तुमची नजर खिळून राहिल.

कुटुंबाला वाचवण्याचा संघर्ष
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या टीझरमध्ये पेंडोराच्या आश्चर्यकारक जगाची झलक पाहायला मिळत आहे. तिथे राहणारे निळ्या रंगाचे लोक सामान्य माणसापेक्षा खूप वेगळे दिसतात. परंतु या लोकांना आपल्या जगात शांततेने राहायला आवडते. टीझरमध्ये हे निळ्या रंगाचे लोक सामान्य माणसांबरोबर फिरताना दिसत आहेत, परंतु यावेळी सुद्धा हे लोक आपल्या कुटुंबाला आणि जगाला वाचवण्यासाठी खूप संघर्ष करताना दिसून येतील. ज्याची झलक तुम्हाला टीझरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

- Advertisement -

पाण्यामध्ये शूट करण्यात आला चित्रपट

 ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट पाण्याच्या आतमध्ये शूट करण्यात आला होता. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून जेम्स कॅमेरून सोशल मीडियावर दाखवत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाचे टीझर प्रचंड वायरल होत आहे. चित्रपटाचे विज्युअल इफेक्ट्स खूप कमाल दाखवले आहेत. तसेच यातील प्रत्येक सीन जबरदस्त आहे. ज्याला पाहून तुमच्या मनात हा चित्रपट पाहण्याची इच्छा होईल.

- Advertisement -

या दिवशी होणार रिलीज
जेम्स कॅमेरून यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये Zoe Saldana, Sam Worthington, Sigourney Weaver, Stephen Lang, Cliff Curtis, Joel David Moore, CCH Pounder, Edie Falco, Jemaine Clement, and Kate Winsle या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी इंग्लिश, हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

 

 


हेही वाचा :‘झॉलीवूड’ चित्रपटामध्ये झळकणार झाडीपट्टीचे १३० कलाकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -