‘अवतार 2’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’16 डिसेंबर 2022 रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली होती. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत तर एकूण 475 कोटी कमावले होते. दरम्यान, आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘अवतार 2’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Avatar 2 Full Movie Download in Hindi: James Cameron's visual spectacle leaked online in HD on Filmyzilaa, Telegram, Movierulz

‘अवतार 2’ येत्या 7 जून रोजी डिज्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याबाबत स्वतः डिस्नीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून माहिती दिली आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जेम्स कॅमेरुनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ कोविडनंतर रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये आघाडीवर आहे. या चित्रपटाने जगभरात 2.3 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय केला होता.

‘अवतार 2’ नंतर अवतार 3 देखील होणार प्रदर्शित

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

‘अवतार 2’ जेम्स कॅमरुन या चित्रपटाचे आणखी तीन सिक्वेल बनवणार आहे. हे तीन सिक्वेल 2024 ते 2028 या कालावधीत प्रदर्शित होणार आहेत.


हेही वाचा :

‘आदिपुरूष’ चित्रपटातील हनुमानाचा नवा पोस्टर प्रदर्शित