वर्षाचा पहिला दिवस ‘अवतार 2’चा; ‘सर्कस’, ‘दृश्यम 2’च्या तुलनेत कमावले इतके कोटी

रविवारी नवीन वर्षातील पहिला आठवडा सुरु झाला. याचं निमित्ताने प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईत देखील झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्यांच दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे धाव घेतली. त्यामुळे नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सर्कस, अवतार 2 आणि दृश्यम 2 या चित्रपटांच्या कमाईत वाढ झालेली आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने कमावले इतके कोटी

अवतार 2' ने इंडिया में 200 करोड़ कमा कर बनाए रिकॉर्ड, बॉलीवुड की टॉप फिल्मों को कर सकती है पार! - avatar 2 8 day india box office collection 4th highest forजेम्स कॅमरुनच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 41 कोटी तर दुसऱ्या दिवशी 42 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 46 कोटी कमावले असून चौथ्या दिवशी 14-16 कोटी आणि पाचव्या दिवशी 18 कोटी कमावले. तर सहाव्या दिवशी 15.75 कोटी आणि सातव्या दिवशी 13.50 कोटी कमावले आहेत. आठव्या दिवशी 12.85 कोटी तर शनिवारी या चित्रपटाने 4.55 कोटी आणि रविवारी 16.50 कोटी कमावले आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 333.25 कोटी कमाई केली आहे.

‘सर्कस’ची बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई

सर्कसरणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी 8.2 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटी कमावले होते. दरम्यान, शनिवारी या चित्रपटाने 1.55 कोटी तर रविवारी या चित्रपटाने 2.20 कोटी कमावले आहेत. शिवाय आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 35 कोटींचा आकडा पार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण 150 कोटींचा खर्च केला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘दृश्यम 2’ने केला कोटींचा टप्पा पार

दृश्यम 2श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 64 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील ‘दृश्यम 2’ने करोडोंची कमाई केली होती. शनिवारी या चित्रपटाने 1.2 कोटी कमावले तर रविवारी 1.90 कोटी कमावले आहेत. भारतातील बॉक्स ऑफिसवर 247.50 ची एकूण कमाई करण्यात आली आहे.


हेही वाचा :

केतकीने काढलेल्या टॅटूचा थेट संबंध शरद पवारांशी; पोस्ट शेअर करत म्हणाली…