घरमनोरंजन‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ लवकरच होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ लवकरच होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Subscribe

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, 28 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत तर एकूण 454 कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, अशातच हा चित्रपट लवकर ओटीटीवर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ लवकरच होणार ओटीटीवर प्रदर्शित

- Advertisement -

Avatar 2 Full Movie Download in Hindi: James Cameron's visual spectacle  leaked online in HD on Filmyzilaa, Telegram, Movierulzअनेक प्रेक्षक असे असतात ज्यांना चित्रपट चित्रपटगृहात न पाहता तो घरबसल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत ओटीटीवर पाहायचा असतो. अशा प्रेक्षकांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’येत्या काही दिवसात ओटीटीवर पाहता येणार आहे. ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’चित्रपट डिज्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. डिज्नी+हॉटस्टारवर कोणत्याही चित्रपटाला प्रदर्शित होऊन 45 दिवस पूर्ण झाल्यावर प्रदर्शित करण्यात येत. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती निर्मात्यांनी दिलेली नाही.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने कमावले इतके कोटी
जेम्स कॅमरुनच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 193.6 कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 100 कोटी कमावले होते. तर तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 59.85 कोटी कमावले असून चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने 4.19 कोटी कमावले दरम्यान आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 454 कोटींच टप्पा पार केला आहे. तर जगभरात या चित्रपटाने 14060 कोटींचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘नाटू नाटू’ने पटकावला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’; शाहरुखसहित बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -