घर मनोरंजन अयान मुखर्जीने केला ‘ब्रह्मास्त्र 2’चा प्रोमो

अयान मुखर्जीने केला ‘ब्रह्मास्त्र 2’चा प्रोमो

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट मागच्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य देखील मुख्य भूमिकेत होते. तसेच अभिनेता शाहरुख खान आणि नागार्जुन यांनी देखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान, आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र 2’चा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये अग्नि देव, अमृता आणि शिव यांच्या कार्टून आवृत्तीची झलक पाहता येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अयान मुखर्जीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “‘ब्रह्मास्त्र 2’ देव अर्ली कॉन्सेप्ट आर्ट वर्क, मी ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि 3 च्या व्हिजन आणि कथेवर अनेक महिन्यांपासून सतत काम करत आहे. टीम ब्रह्मास्त्रसाठी या खास दिवशी, शेअर केले आहे. अयान मुखर्जीच्या या पोस्टवर अनेकजण खूप कमेंट्स करताना आणि प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दिसणार दीपिका आणि रणवीरची जोडी

- Advertisement -

ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत. यात दीपिका अमृताची भूमिका साकारणार आहे तर रणवीर देव ही भूमिका साकारणार आहे.

 


हेही वाचा :

जवानने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत गाठला 350 कोटींचा टप्पा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -