मी लग्न झालेल्या पुरुषासोबत… शोएब मलिकसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर आयशा उमरने दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर भारतातही प्रसिद्ध आहे. मागील अनेक दिवसांपासून आयशा, सानिया मिर्झाचा पती माजी क्रिकेटर शोएब मलिकमुळे चर्चेत आली आहे. खरंतर मागील काही वर्षांपूर्वी आयशा आणि शोएब मलिकने रोमाँटिक फोटोशूट केलं होतं ज्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर त्या दोघांचं अफेअर सुरु असल्याच्या बातम्या देखील व्हायरल होऊ लागल्या होत्या. दरम्यान, या अफवांवर आता आयशा व्यक्त झाली आहे.

खरंतर, अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार आहे. अशी बातमी समोर येत होती. यामागचे कारण शोएब आणि आयशाचं अफेअर असल्याचं म्हटलं जात होतं. आयशामुळे सानिया आणि शोएबचा घटस्फोट होणार असल्याचा तर्क लावाला जात होता. त्यामुळे अनेकांनी आयशाला ट्रोल देखील केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Omar (@ayesha.m.omar)

दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत आयशाने शोएब मलिकसोबतच्या फोटोंबाबत आणि इतर अफवांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणाली की, “मी शोएब मलिकसोबत एक प्रोफेशनल फोटोशूट केलं होतं. जर कोणाचं अफेअर सुरु असेल तर ते असं फोटोशूट करुन ऑनलाईन पोस्ट करत नाहीत. शिवाय मी कधीही लग्न झालेल्या पुरुषासोबत नात्यात येण्याचा विचार देखील करु शकत नाही.”

2010 झालं होतं लग्न
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि यांचे लग्न 12 एप्रिल 2010 झाली हैदराबादमध्ये झाले होते. त्यांना इजहान नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या केमिस्ट्रीने एके काळी प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन टाकले होते.

 


हेही वाचा :

दंगल टीव्ही ‘दंगल नया साल धमाल’ कार्यक्रमातून नवीन वर्षाचे करणार जल्लोषात स्वागत