घरमनोरंजनचुलबुल पांडे, सिम्बा पाठोपाठ येणार 'हा' नवीन पोलीस...

चुलबुल पांडे, सिम्बा पाठोपाठ येणार ‘हा’ नवीन पोलीस…

Subscribe

‘चुलबुल पांडे’, ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ या बॉलीवूडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. या तिन्ही पोलीस ऑफिसर्सना मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर, ‘पोलीस अधिकारी असावा तर असा’… अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली. या भूमिकांद्वारे अभिनेता सलमान खान, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांनीही आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली. दरम्यान, या तिघांपाठोपाठ मोठा पडदा दणाणून टाकण्यासाठी एक नवीन पोलीस ऑफिसर लवकरच येत आहे. गेल्यावर्षी आलेल्या ‘

आयुषमान बनणार पोलीस अधिकारी

काही दिवसांपूर्वीच आयुषमानने कॅन्सरशी झुंझणाऱ्या आपल्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामुळे तो सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला होता. त्यापाठोपाठ आता या नव्या बातमीमुळे आयुषमान पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, आयुषमान याचा आगामी चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, यामध्ये तो एका डॅशिंग पोलीस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, कानपूरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

‘बरेली की बर्फी’, ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधूद’ अशा एक से एक चित्रपटातून आयुषमानने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘अंधाधूद’ चित्रपटातील त्याची आंधळ्याची भूमिका तर विशेष भाव खाऊन गेली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही छप्पर फाड के कमाई केली. आयुषमानने प्रत्येक चित्रपटातील त्याची भूमिका तितक्याच उत्तमरित्या साकारत नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला आयुषमान कसा आणि किती न्याय देणार? हे येणारी वेळच सांगेल. मात्र, आपल्या लाडक्या हिरोला पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असणार यात काहीच शंका नाही.

 

View this post on Instagram

 

Happy bday love. ❤️ keep inspiring!

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -