घरमनोरंजनशुभ मंगल...च्या सीक्वलमध्ये दिव्येंदु शर्मासोबत आयुष्मान करणार रोमांन्स?

शुभ मंगल…च्या सीक्वलमध्ये दिव्येंदु शर्मासोबत आयुष्मान करणार रोमांन्स?

Subscribe

अभिनेता दिव्येंदु शर्मा या चित्रपटाचा एक भाग असून आयुष्मान खुराना सोबत रोमान्स करताना दिसणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा असा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांचे चित्रपट हटके असतात. गेल्या काही दिवसांपासून तो आर्टिकल 15, ड्रीम गर्ल और बाला अशा चित्रपटांमध्ये सध्या व्यग्र आहे. याशिवाय शुभ मंगल सावधान या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आयुष्यमान प्रेक्षकांना दिसणार आहे. शुभ मंगल ज्यादा सावधान असे या सिक्वलचे नाव असून या चित्रपटात आयुष्यमान प्रमुख भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे कथानक समलैगिंक प्रेमकथेवर आधारलेली आहे.

अभिनेता दिव्येंदु शर्मा या चित्रपटाचा एक भाग असून आयुष्मान खुराना सोबत रोमान्स करताना दिसणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. परंतु या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. आनंद एल रायच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असून हितेश केवल्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

 

View this post on Instagram

 

I thought I was the brightest. And then I saw my shoes. Bonafide “solemates.” Styled by @ishabhansali

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

- Advertisement -

या चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, ज्यावेळी रूढी- परंपरेचे अनुकरण करणारे कुटुंब आपला मुलगा समलैंगिक आहे, असे समजल्यावर ही परिस्थितीला कसे सामोरे जातात, हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची शुटिंग ऑगस्ट पर्यंत सुरू होणार आहे.

- Advertisement -

अभिनेता दिव्येंदु हा मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये दिसला होता. यामध्ये त्याने मुन्नाची नकारात्मक भूमिका साकारली होती. यापुर्वी तो बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटात शाहिद कपूरसह अभिनय करताना दिसला होता. २०१७ मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधान या चित्रपटात आयुष्यमानने मुख्य भूमिका साकारली होती तसेच अभिनेत्री भूमी पेडणेकर ही प्रमुख भूमिकेत दिसली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -