आयुष्मान खुरानाच्या ‘Action Hero’ चा जबरदस्त टीझर रिलीज

Ayushmann Khurrana turns Action Hero for first time, shares teaser
आयुष्मान खुरानाच्या 'Action Hero' चा जबरदस्त टीझर रिलीज

बॉलिवूडमध्ये आजवर हटके भूमिका साकारत अभिनेता आयुष्मान खुरानाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आयुष्मानने रोमॅण्टिक आमि विनोदी भूमिकांच्या माध्यमातून सर्वांना आपलसं केले. या भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठ्याप्रमाणात दाद मिळाली. मात्र आयुष्मान खुराना एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांत्या भेटीस येणार आहे. आयुष्मानने नुकतीच आगामी सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात तो रोमॅण्टिक किंवा विनोद भूमिकेत नाही तर एका अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचे नावही ‘अ‍ॅक्शन हीरो’ (Action hero) असं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)


नुकताच ‘Action hero’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात आयुष्मान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आयुष्मानने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचा नवाकोरा टीझर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने, “अडचण फक्त एकच आहे की मला भांडण्याचा अभिनय करता येतो…मात्र भांडता येत नाही…काही तरी वेगळं करण्यासाठी मी खूप उत्साही आहे. आनंद रॉय आणि भूषण कुमार यांच्यासह काम करतोय.” अशा आशयाची कॅप्शन दिली आहे. या सिनेमाचा टीझर पूर्णपणे अ‍ॅनिमेटेड आहे. यात बॅकग्राउंडला आयुष्मानचा आवाज ऐकू येतोय.

विशेष म्हणजे आयुष्मान पहिल्यांदाच अ‍ॅक्शन अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे. अ‍ॅक्शन हीरो’ हा सिनेमा २०२२ सालामध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग भारतासह इंग्लडमध्ये होणार असून अनुरुद्ध अय्यर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्या, आयुष्मानचा आगामी चंडीगढ करें आशिकी सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. या सिनेमा १० डिसेंबरला देशातील सर्व चित्रपट गृहांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.