Video: दूधीच्या ज्यूसमुळे आयुष्मान खुरानाच्या पत्नीला ICUमध्ये व्हावे लागले दाखल, शेअर केला अनुभव

ayushmann khurrana wife Tahira Kashyap was admitted to ICU because of lethal bottle gourd toxicity
Video: दूधीच्या ज्यूसमुळे आयुष्मान खुरानाच्या पत्नीला ICUमध्ये व्हावे लागले दाखल, शेअर केला अनुभव

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, लेखक आणि दिग्दर्शक ताहिरा कश्यपला नुकतंच फूड पॉइजनिंग झाल्यामुळे दोन दिवसांसाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दूधीच्या ज्यूसमुळे फूड पॉइजनिंग झाले होते. याबाबत सांगण्यासाठी आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपने काल, शनिवारी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता आणि लोकांनी दूधीचा ज्यूस घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

ताहिराने व्हिडिओमध्ये घटनेबाबत सांगितले की, ‘कडवट असून हळद, दूधीचा ज्यूस आणि आवळा मिश्रणापासून तयार केलेला ज्यूस ताहिरा प्यायली. यामुळे तिला १७ वेळा उलट्या झाल्या होत्या आणि ब्लड प्रेशर ४० पर्यंत पोहोचला होता. यानंतर मला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व घटनेनंतर मी स्थिर असली तरी हा फार वाईट अनुभव होता.’

ताहिराने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कृपया हे ऐका. इन्स्टाग्राम जागरुकता पसरवण्याचे एक अद्भुत प्लॅटफॉर्म आहे. कृपया दूधीच्या विषबाधाबद्दल जाणून घ्या. मी सेटवर बनवत असलेल्या व्हिडिओत शांतेत दिसत आहे, पण मला गंभीर धक्का बसला होता. माझ्या डॉक्टरांना आजूबाजूला जागरुकता पसरवण्यासाठी सांगितले होते. मी माझ्या ओळखीच्या लोकांना फोन लावला आणि दूधीच्या ज्यूसबाबत सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने फक्त ज्यूसचे सेवन नका करू. मी यामुळे आयसीयूमध्ये दाखल झाली होती.’

ताहिराची आता तब्येत सुधारली असून ती आगामी चित्रपट ‘शर्माजी की बेटी’च्या सेटवर परतली आहे. यादरम्यान तिचा पती आयुष्मान खुराना आनंद एल रायसोबत ‘अॅक्शन हिरो’ नावाच्या चित्रपटात काम करत आहे. तसेच याशिवाय तो ‘डॉक्टर जी’, ‘चंडीगढ करे आशिकी’ आणि ‘अनेक’ यासारख्या चित्रपटात दिसणार आहे.


हेही वाचा – Cruise Drugs Case: मुलाच्या काळजीने शाहरुख अस्वस्थ; अन्नही गोड लागेना