Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'डॉक्टर जी'च्या 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याला आयुष्मान खुराना देणार आवाज

‘डॉक्टर जी’च्या ‘ओ स्वीटी स्वीटी’ गाण्याला आयुष्मान खुराना देणार आवाज

Subscribe

बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाने सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘डॉक्टर जी’ चित्रपटातील ‘ओ स्वीटी स्वीटी’ गाण्याची झलक रिलीज सादर केली असून, हे गाणे आयुष्मानने स्वतः गायले आहे. हे गाणे तुमची हृदयाचा ठाव घेईल आणि संपूर्ण गाणे पाहण्यासाठी तुम्हाला उत्तेजित करेल.

‘ओ स्वीटी स्वीटी’ ही अमित त्रिवेदीची हृदयस्पर्शी रचना आहे, ज्याचे बोल राज शेखर यांनी लिहिले आहेत. आयुष्मानच्या आवाजाने जी जादू निर्माण केली असून, हे गाणे त्याच्या सौंदर्यात्मक आणि मिनिमलिस्टिक सेटअपसह एक व्हिज्युअल ट्रीट बनले आहे जे संगीतप्रेमींना थेट परफॉर्मन्सची अनुभूती देते. हे गाणे खरोखरच अभिनेत्याच्या हृदयाच्या जवळ असल्याने ते लवकरात लवकर प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. त्यामुळे टीम डॉक्टर जी आणि जंगली पिक्चर्सने या गाण्याचा स्निपेट रिलीज करून प्रेक्षकांसमोर या गाण्याची झलक सादर करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

सुमित सक्सेना, सौरभ भरत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यप यांनी लिहिलेला ‘डॉक्टर जी’ `14 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जंगली पिक्चर्सच्या आगामी स्लेटमध्ये ‘वो लड़की है कहाँ?’, ‘डोसा किंग’, ‘उलज’ आणि ‘क्लिक शंकर’ यांचा समावेश आहे.


हेही वाचा :

रश्मिकाला पाहून चाहत्याने घेतला चक्क हृदयावर ऑटोग्राफ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -