घरमनोरंजनप्रदर्शनापूर्वीच चित्रपटांची 'कोर्ट'वारी!

प्रदर्शनापूर्वीच चित्रपटांची ‘कोर्ट’वारी!

Subscribe

अकाली टक्कल पडण्याच्या समस्येमुळे त्रासलेल्या तरूणाची व्यथा सांगणारी बॉलिवूडमधील ‘बाला’ व ‘उजडा चमन’ हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण दोनही चित्रपट प्रदर्शनाआधीच न्यायालयात एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ‘उजडा चमन’चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी ‘बाला’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

बाला मधील तब्बल १५ दृश्ये ही उजडा चमन चित्रपटातील दृश्यांशी मिळतीजुळती आहेत. यासाठीच कुमार मंगत पाठक यांनी न्यायालयात धाव घेतली. पाठक यांचा आरोप खरा ठरल्यास ‘बाला’च्या निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलावी लागणार आहे.
बाला हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर तर, ‘उजडा चमन’ ८ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत झळकणार आहे. आयुष्मान खुराणा बाला या चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहेत. या दोन्ही चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित होताच या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
‘बाला’ याआधी १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी ही तारीख बदलून ७ नोव्हेंबर केली आहे. त्यावरूनच वादाला सुरुवात झाली आहे. आता ‘उजडा चमन’चे निर्माते न्यायालयात गेल्यानं या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाचा निर्णय तिथंच होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -