घरमनोरंजनWorld Cancer Day :कॅन्सरशी जिद्दीने लढणाऱ्या पत्नीसाठी आयुष्यमान खुरानाची खास पोस्ट, पत्नीचे...

World Cancer Day :कॅन्सरशी जिद्दीने लढणाऱ्या पत्नीसाठी आयुष्यमान खुरानाची खास पोस्ट, पत्नीचे कौतुक करताना म्हणाला…

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurana) आणि ताहिरा कश्यप (Tahira kashyap) हे बॅालिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण सुरु असताना एकमेकांना डेट करणं सुरु केलं. दरम्यान आता या जोडप्यांच्या लग्नाला 15 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.

आयुषमान आणि ताहिरा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता जेव्हा 2019 मध्ये ताहिराला ‘स्टेज 0’ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. यानंतर तिची मॅस्टेक्टॉमी प्रक्रिया झाली. मात्र, आता ताहिरा सावरली आहे. आज ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ च्या निमित्ताने आयुष्यमान ने पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

आयुषमानने केलं ताहिराचं कौतुक
आज 4 फेब्रुवारी आज ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ च्या निमित्ताने आयुषमान खुरानाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ताहिरासोबतचे फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो दोघांचा सेल्फी घेतानाचा आहे. यानंतर दुसऱ्या फोटोत ताहिराच्या शस्त्रक्रियेच्या खुणा दिसत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या फोटोत ताहिरा दिसत आहे.

या फोटोंसोबत अभिनेत्याने कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये त्याने कॅन्सरवर मात करताना पत्नीच्या शौर्याचे कौतुक केले आहे. आयुषमानने लिहिले, “ही ती मुलगी आहे. जीला मी पंजाब विद्यापीठातील झोपडी नंबर 14 मध्ये समोसा खाताना आणि चहा पिताना पाहिले आहे. तुझ्या @spokenfest मधील पदार्पणासाठी शुभेच्छा. तुझ्या सहासीपणावर आणि तुझ्यावर प्रेम करत राहिल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

- Advertisement -

कॅन्सरबाबत काय म्हणाली होती ताहिरा?
मिड-डे ला दिलेल्या मुलाखतीत, ताहिराने म्हणाली, मी माझ्या शरिराला मनाला कधीहा एक युनिट मानले नाही. मी नेहमी माझ्या शाररिक स्वास्थ्याला महत्व दिले. मानसिक समस्या काहीच नसतात. त्यामुळे भरपूर व्यायाम केला. त्यामुळे मला वाटतय की, कर्करोगाने नकारत्मकाता आणली होती. मी कोणाकडे जाण्यापेक्षा वेदना सहन करण्याचे ठरवले. माझा पती रोज रडत असायचा. मी रोज तासंतास रडताना घालवले आहेत. रोज सकाळी एक सुखी व्यक्ती असल्याप्रमाणे मी राहत होते. कारण माझ्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ नये, असा त्यामागील हेतू होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -