घरमनोरंजनप्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आयुष्मानच्या 'डॉक्टर जी' चित्रपटाने कमावला कोटींचा गल्ला

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आयुष्मानच्या ‘डॉक्टर जी’ चित्रपटाने कमावला कोटींचा गल्ला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा बहुचर्चित चित्रपट ‘डॉक्टर जी’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये आयुष्यमान सोबतच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह देखील प्रमुख भूमिकेत आहेत. ‘डॉक्टर जी’ चित्रपटाला सुरुवातीपासूनच सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. चित्रपटाच्या अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे तसेच या विकेंडमधील याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
आयुष्मान खुरानाच्या ‘चंडीगढ़ करे आशिकी’ आणि ‘अनेक’ या दोन्ही प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी खूप कमी कमाई केली होती. ‘चंडीगढ़ करे आशिकी’ ने 1.77 कोटीची कमाई केली होती तर ‘अनेक’ चित्रपटाने 1.75 कोटींची कमाई केली होती. ‘डॉक्टर जी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 3.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

- Advertisement -

‘डॉक्टर जी’च्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता
‘डॉक्टर जी’ चित्रपटाने आत्तापर्यंत 3.5 कोटी रुपयांची कमाई केली असून या विकेंडमध्ये या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनुभूती कश्यप दिग्दर्शित, ‘डॉक्टर जी’ हा कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे, ज्याचे सहलेखन तिच्यासह, सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत यांनी केले आहे. आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डॉक्टर जी’ 17 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’चा नवा दमदार पोस्टर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -