HomeमनोरंजनDev Joshi : 'बालवीर' फेम अभिनेत्याने उरकला गुपचूप साखरपुडा;

Dev Joshi : ‘बालवीर’ फेम अभिनेत्याने उरकला गुपचूप साखरपुडा;

Subscribe

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाच्या आयुष्यात काय सुरु आहे? हे जाणून घेणं अगदी सोप्पं झालं आहे. त्यात सेलिब्रिटी मंडळी ही हमखास सोशल मीडियावर सक्रिय असतात. हे कलाकार याच माध्यमातून आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी चाहत्यांसह शेअर करतात. यामध्ये बऱ्याच बालकलाकारांचादेखील समावेश आहे. ‘बालवीर’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेत दिसलेला अभिनेता देव जोशी आता मोठा झाला आहे. इतकंच नव्हे तर नुकताच त्याने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे. याबाबत त्याने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

नेपाळच्या कामाख्या मंदिरात पार पडला सोहळा

‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देव जोशी याचा नुकताच साखरपुडा पार पडला. अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीचे नाव आरती असल्याचे सांगितले आहे. तसेच फोटोंच्या माध्यमातून अभिनेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील कामाख्या मंदिरात त्यांनी साखरपुडा केल्याचे समजत आहे. दोघेही या फोटोत एकमेकांना साजेसे दिसत आहेत. त्यांच्या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या संख्येने कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘विश्वास, प्रेम आणि आयुष्य..’

अभिनेता देव जोशीने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करताना एक सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. ज्यात त्याने म्हटलंय, ‘विश्वास, प्रेम आणि आयुष्यात आम्ही एकत्र आहोत!’ या कॅप्शनसोबत त्याने देव आरती असा हॅशटॅग दिला आहे. सोबतच एंगेज्ड हा हॅशटॅगदेखील जोडला आहे. देवने शेअर केलेल्या फोटोत ते दोघे मंदिराच्या परिसरात दिसत आहेत. शिवाय त्यांचा पेहराव अत्यंत साधा आहे. त्यांच्या या साधेपणाचे नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेता देव जोशीने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यामध्ये अनेकांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत आश्चर्यदेखील व्यक्त केले आहे. या फोटोशिवाय त्याने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. जो व्हायरल होतोय.

अभिनेता देव जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘बालवीर’ ही मालिका लहान मुलांनी फार पसंत केली होती. या मालिकेचे जवळपास ५ सीजन झाले. ज्यामध्ये देवने सुपरहीरो बालवीरची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले. शिवाय ‘महिमा शनि देव की’, हमारी देवरानी, ‘देवों के देव महादेव’ या मालिकांमध्येही त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.