Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बबन फेम भाऊसाहेब शिंदेची 'रौंदळ' चित्रपटातील धडाकेबाज भूमिका

बबन फेम भाऊसाहेब शिंदेची ‘रौंदळ’ चित्रपटातील धडाकेबाज भूमिका

राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'ख्वाडा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Related Story

- Advertisement -

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘ख्वाडा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रौंदळ’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. भाऊसाहेब शिंदे याने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. रौदळ या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने स्वत: भाऊसाहेब शिंदे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता एक रांगडा गडी पहायला मिळतो. पांढऱ्या रंगाचा शर्ट, डाव्या हातात कडं, खांद्यावर गाडीचा टायर काढण्यासाठी वापरली जाणारी रक्ताने माखलेली टॉमी, वाढलेली दाढी आणि चेहऱ्यावर जखम झालेल्या अवस्थेतील भाऊसाहेब शिंदेचा लूक या पोस्टरवर पाहायला मिळतो.

 पोस्टर पाहून या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार हे नक्की. यावरुन भाऊसाहेब पुन्हा एकदा हटके भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे्. त्यामुळे हे पोस्टर पाहिल्यानतर भाऊसाहेब रौंदळ मध्ये कशाप्रकारची भूमिका साकारणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


- Advertisement -

हे वाचा-  दत्तक घेतलेल्या मुलीवर वाईट कमेंट करणार्‍या ट्रोलर्सना मंदिरं बेदीने सुनावले खडेबोल

- Advertisement -