Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोमधून 'बबिता' गायब

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमधून ‘बबिता’ गायब

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांनीही या मालिकेला अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहेत. मालिकेतील जेठालाल, तारक, दयाबेन, भिडे, बबिताजी अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. मात्र या मालिकेतील ‘बबिता’ हे पात्र आता तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. हे पात्र साकरणारी अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्त. या भूमिकेमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. जेठालाल आणि बबितामधील संवादाला प्रेक्षक अधिक पसंती दर्शवतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

यामुळे नेमकी मुनमुन दत्त कुठे गेली? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होत आहे. लॉकडाऊनदरम्यान राज्यात मालिकांचे शुटिंग पूर्णपणे बंद होते. यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे शूटिंग दमणमध्ये हलविण्यात आले होते. मात्र आता लॉकडाउनचे नियम शिथिल केल्याने मुंबईत शूटिंगला पुन्हा सुरूवात झाली आहे. मात्र शुटिंगला सुरुवात झाल्यापासून मुनमुन गायब आहे. अद्याप एकदाही ती सेटवर आली नाही. त्यामुळे तिच्या गैरहजेरीतही मालिकेचे शुटिंग सुरु आहे. यामुळे मुनमुन दत्ताने ही मालिका सोडल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र मुनमुनने अद्याप तरी मालिका सोडली असल्याच्या बातम्यांवर अधिकृत मत जाहीर केले नाही.

जातीवाचक शब्दांचा वापर केल्यामुळे मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या वादामुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली होती. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कोर्टाने नंतर तिच्याविरोधात गुन्ह्याला स्थगिती दिल्याने तिने दिलासा व्यक्त केला.

- Advertisement -


 

- Advertisement -