घरमनोरंजनNetflix घेऊन येतेय घोटाळेबाज विजय मल्ल्या आणि नीरव मोदीवर डॉक्यूमेंट्री सिरीज

Netflix घेऊन येतेय घोटाळेबाज विजय मल्ल्या आणि नीरव मोदीवर डॉक्यूमेंट्री सिरीज

Subscribe

देशातील घोटाळे पडद्यावर उघड करण्याचा ट्रेंड सुरु आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्ह १९९२ मध्ये झालेल्या स्टॉक मार्केट घोटाळा वेब सीरीजच्या रुपात लवकरच रिलीज करणार आहे. दुसरीकडे नेटफ्लिक्स देशातील चार बड्या उद्योगपतींनी केलेली पैशाची फसवणूकही एका माहितीपट मालिकेद्वारे पडद्यावर आणणार आहे. नेटफ्लिक्स ‘बॅड बॉय बिलिनियर्स: इंडिया’ नावाची वेब सीरिज आणत आहे. या मालिकेमध्ये आर्थिक फसवणूकीचा आरोप असलेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या, सुब्रता रॉय सहारा आणि रामलिंगम राजू यांची कथा आहे. ही सीरिज सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये काय आहे?

नेटफ्लिक्सने मंगळवारी त्याचा ट्रेलर प्रसिद्ध केला. एक प्रकारे डॉक्युमेंटरी वेब सिरीज आहे. यामध्ये काही तज्ज्ञ आहेत जे या सर्व घोटाळेबाज व्यावसायिकांची कथा सांगत आहेत. त्यांनी लोकांची नाडी कशी पकडली आणि हळूहळू मोठे होऊ लागले हे देखील ते सांगत आहेत. त्यांनी पैसे कुठून गोळा केले आणि त्यांनी कुठे खर्च केले? या लोकांनी पैशाची हेराफेरी कशी केली हे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

सोनी लिव्ह शेअर बाजारातील घोटाळेबाज हर्षद मेहताचीही कथा घेऊन येत आहे. हंसल मेहता यांनी ‘स्कॅम १९९२: हर्षद मेहता स्टोरी’ नावाची वेब सीरिज तयार केली आहे. तथापि, माहितीपट नसून एक संपूर्ण वेब सीरिज आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. त्याचबरोबर नेटफ्लिक्सवर ‘बॅड बॉय बिलिनियर्स: इंडिया’ १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. यामुळे दोघांमध्ये टक्कर होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -