दुसऱ्याच्या लग्नात अक्षय कुमारचा धिंगाणा; स्टाईल पाहून चाहते म्हणाले, ‘बेवफा’

Bachchhan Paandey Song Saare Bolo Bewafa: Akshay Kumar turns on gangster mode to deal with heartbreak
दुसऱ्याच्या लग्नात अक्षय कुमारचा धिंगाणा; स्टाईल पाहून चाहते म्हणाले, 'बेवफा'

अक्षय कुमार स्टारर ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातील ‘सारे बोलो बेवफा’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात अक्षय कुमार एका लग्न समारंभात चक्क वधूसमोर धिंगाना घालताना दिसत आहे. या गाण्याचा व्हिडीओ चाहत्यांना इतका आवडला आहे की, त्याला आत्तापर्यंत 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अरोसा खानने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
अरोसा खान या गाण्यात नववधूच्या भूमिकेत झळकतेय, जिच्या एक नंबर डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘सारे बोलो बेवफा’ या गाण्याच्या यशानंतर अरोसा खान चांगलीत चर्चेत आली आहे. प्रेक्षकांनी तिच्या कॉन्फिडन्सची आणि बिधास्त डासिंग स्कीलची चांगलीच प्रशंसा केली आहे.

रंजक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी अरोसा खानने तिचा पहिला चित्रपट ‘बच्चन पांडे’ साइन केला त्याच दिवशी तिला कायद्याची पदवी मिळाली. ‘सारे बोलो बेवफा’ अभिनेत्री अरोसा खान साजिद नाडियाडवालाच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ चित्रपटात क्रिती सेनन, अरशद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट 18 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.


The Kashmir Files च्या यशावरील बॉलिवूडचे मौन पाहून कंगनाचा संताप, म्हणाली ‘यश पाहून सगळे गप्प’