घरताज्या घडामोडीसहदेव आणि बादशाहचं 'Bachpan Ka Pyaar' गाणं प्रदर्शित, २ तासांत मिळाले लाखो...

सहदेव आणि बादशाहचं ‘Bachpan Ka Pyaar’ गाणं प्रदर्शित, २ तासांत मिळाले लाखो व्हूयज

Subscribe

सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण स्टार होईल हे सांगता येत नाही. असाच रातोरात स्टार झालेला सहदेव चांगलाच चर्चेत आला आहे. सहदेवचं ‘बचपन का प्यार’ या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सहदेवच्या गाण्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर बादशाहने या गाण्याचे एक रिमिक्स व्हर्जन शेअर केले होते. त्यानंतर बाहशाह लवकरचं सहदेवसोबत गाणं करणार असल्याचे समोर आले होते. बाहशाहसोबतचं सहदेवचं ‘बचपन का प्यार’ गाणं आज प्रदर्शित झालं आहे. अवघ्या दोन तासांत या गाण्याला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्यामध्ये सहदेव बादशाहसोबत डान्स करताना दिसत आहे. सहदेव आणि बादशाह व्यतिरिक्त या गाण्यात आस्था गिल आणि रिको देखील आहे. या गाण्याचे बोल स्वतः बादशाहने लिहिले आहेत. बादशाहच्या ऑफिशिअर यूट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित झालं असून आता युट्यूबच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये देखील गाणं अॅड झालं आहे.

- Advertisement -

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिर्दो छत्तीसगढमधील सुकमा येथील राहणार आहे. त्याच्या गाण्यावर खूप सारे रिल्स बनवण्यात आले होते. बादशाहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट्स गाणी बादशाहची आहेत. ‘डीजे वाले बाबू’, ‘वखरा स्वॅग’, ‘चुल’, ‘मूव्ह योर लक’, ‘हॅपी हॅपी’ अशी अनेक बादशाहीची गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. तसेच नुकतेच प्रदर्शित झालेले जॅकलीनसोबतचे गाणे ‘पानी-पानी’ हे गाणं कित्येक दिवस युट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये होतं.


हेही वाचा – आलिया रणबीरचे यंदा कर्तव्य, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -