घरताज्या घडामोडीकौन से चक्की का आटा खाते हो ? धर्मेंद्रजींना बादशाहचा सवाल, उत्तर...

कौन से चक्की का आटा खाते हो ? धर्मेंद्रजींना बादशाहचा सवाल, उत्तर मिळालं…

Subscribe

कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी नेहमी प्रमाणे धम्माल उडवून दिली. दरम्यान बादशाहने त्यांना एक प्रश्न विचारला ज्याच्यावर उत्तर देत धर्मेंद्र यांनी बादशाहची बोलतीच बंद केली.

एव्हरग्रीन अभिनेता धर्मेद्र अधून मधून अनेक हिंदी रिअँलटी कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत असतात. धर्मेंद्र यांनी नुकतीच इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये हजेरी लावली होती. शोचा प्रोमो समोर आला आहे. लवकरच संपूर्ण एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी नेहमी प्रमाणे धम्माल उडवून दिली. दरम्यान बादशाहने त्यांना एक प्रश्न विचारला ज्याच्यावर उत्तर देत धर्मेंद्र यांनी बादशाहची बोलतीच बंद केली.

इंडियाज गॉट टॅलेंटच्या धर्मेंद्र स्पेशल एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात धर्मेंद्र परिक्षक असलेल्या किरण खेर, शिल्पा शेट्टी आणि बादशाहा सोबत बसले आहेत. त्यांच्यासमोर शोमधील टॅलेंटेड स्पर्धक सादरिकरण करण्यासाठी येतात. त्यांचे सादरीकरण संपताच स्पर्धक धर्मेंद्रजींना म्हणतात, घरातल्यांनी सांगितले आहे, येताचा धर्मेंद्र जींचा एक मुक्का खाऊन या. स्पर्धकांची मागणी पूर्ण करण्यासाठी धर्मेंद्र थेट स्टेजवर जातात.

- Advertisement -

याचवेळी बादशाह धर्मेंद्र यांना विचारतो, ‘आप कौनसी चक्की का आटा खाते हो त्यामुळे तुम्ही आजही इतके फिट आहात ?’ बादशाहचा प्रश्न ऐकून धर्मेंद्रजी हसत हसत म्हणतात, ‘जिस चक्की का आटा मे खाता हू वो चक्की मांगवा ली है मैंने’, खरोखर धर्मेंद्र चक्की स्टेजवर मागवतात आणि बादशाहाला धर्मेंद्रजींनी मागवलेल्या चक्कीवर दणळ दळावं लागतं.

- Advertisement -

 

या आधी देखील शोचा एक प्रोमो व्हायरल झाला होता ज्यात धर्मेंद्र आणि किरण खेर एकत्र शोले मधील सीन रिक्रिएट करतात. इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावर पहिल्यांदाच किरण खेर बसंती बनली आणि धर्मेंद्रला तिने बंदूक चालावायला शिकवली.


हेही वाचा – Dil Bechara फेम अभिनेत्रीवर अमेरिकन फ्लाइटमध्ये गैरवर्तन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -