घरमनोरंजन७२ व्या 'ब्रिटीश अ‍कॅडमी चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अभिनेता  ऋषी कपूर,इरफान खानला वाहिली...

७२ व्या ‘ब्रिटीश अ‍कॅडमी चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अभिनेता  ऋषी कपूर,इरफान खानला वाहिली श्रद्धांजली

Subscribe

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सोहळे हे ऑनलाइन रित्या पार पडत आहेत. तसेच सोहळ्यांचे आयोजनही अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. नुकताच ७२वा ‘ब्रिटीश अ‍कॅडमी फिल्म अवॉर्ड्स’ सोहळा पार पडण्यात आला. या सोहळ्यात दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान तसेच ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिल मध्ये दोघांचे निधन झाले होते. यांच्या निधंनानंतर बॉलिवूड मध्ये तसेच चाहत्यानमध्ये शोककळा पसरली होती.

- Advertisement -

२ वर्षे कर्करोगाशी झुंझ दिल्यानंतर २९ एप्रिलला अभिनेता इरफान खान याने अखेरचा श्वास घेतला. तसेच आदल्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते एकेकाळी चॉकलेट बॉय अशी ओळख असणारे सुप्रसिद्ध अभिनेते ऋषीकपूर यांनी देखील जगाचा निरोप घेतला. ७२ वा ‘ब्रिटीश अ‍ॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स सोहळ्या’च्या मेमोरिअम सेगमेंट दरम्यान दोघाही कालाकारांच्या सिनेसृष्टीतला प्रवास दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोशल मीडिया वर अनेक चाहत्यांनी या खास क्षणाचे व्हिडीओ तसेच फोटो शेअर करत चाहते अत्यंत भावूक होत आहेत. या दोन कलाकारांन व्यतिरिक्त जोर्च सेगल, विंडसर, ओलिवा दि, एलन पार्कर, मॅक्स वॉन, किर्क, ख्रिस्तोफर पाल्मर,चॅडविक बोसेमन,याफेट कोट्टो, बार्बरा या दिवंगत कलाकरांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली होती.


हे ही वाचा – इरफान खानच्या लेकाचे सिनेसृष्टीत पदार्पण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -