घरताज्या घडामोडीबागबान फेम अभिनेता साहिल चड्डाचा अपघात, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

बागबान फेम अभिनेता साहिल चड्डाचा अपघात, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Subscribe

अभिनेता साहिलला दोन फुटापर्यंत फरफरड नेले

बागबान या सुपरहिट सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचलेला अभिनेता साहिल चड्डाचा नुकताच अपघात झाला आहे. (Baghlan fame actor Sahil Chadda’s accident )साहिल आणि त्याची पत्नी प्रोमिला दोघेही या अपघातात मरता मरता वाचले आहेत. दोघांनाही या अपघातात जबरदस्त मार लागला आहे. सध्या दोघांवर मुंबईच्या बाँबे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साहिल आणि त्याची प्रोमिला त्यांची मिटिंग संपवून घरी निघाले होते. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजवळ त्यांची गाडी पार्क केली होती. संध्याकाळी ६:४५ वाजता मिटिंग संपवून ते गाडीजवळ जाताना मागून एका भरधाव अँब्युलन्सने दोघांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अँब्युलन्सने अभिनेता साहिलला दोन फुटापर्यंत फरफरड नेले. यात त्यांच्या पायाला व पोटाला भरपूर मार लागला आहे. तर त्याची पत्नी प्रोमिलाच्या दोन्ही पायांना फॅक्चर करण्यात आले आहे, अशी माहिती अभिनेता साहिल चड्डाने दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saahil Chadha (@saahilchadha)

- Advertisement -

साहिल सांगितल्याप्रमाणे दोघांना मागून धकड देणाऱ्या अँब्युलन्सच्या ड्राईव्हराला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. अपघात होताच साहिलने पोलिसांना आणि त्याचा मित्रमंडळींना फोन केला. दोघांनाही त्वरित रुग्णालयात भरती करण्यात आले. सोमवारी साहिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. साहिलला पूर्णपणे बरे होण्यासाठी २ ते ३ आठवडे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

देवाच्या कृपेने मोठा अपघात होता होता टळला.  पोलीस,मित्र आणि आमचा स्टाफ वेळेवर आले म्हणून आम्हाला खूप मोठी मदत झाली असे साहिलने म्हटले आहे. दरम्यान साहिल आणि प्रोमिलाला एप्रिल महिन्याच कोरोनाची लागण झाली होती. दोघेही १० दिवस होम क्वारंटाईन होऊन औषधे घेत होते. त्यातून बाहेर आल्यावर दोघेही कामाला लागले होते त्यातच त्यांच्यावर नवीन संकट आले.

- Advertisement -

हेही वाचा – मित्रांनी पाठीत सुरा खुपसला,श्रेयस तळपदेने केला आपल्या करिअरबाबत मोठा खुलासा !

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -