अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात भोपाळमध्ये जामीनपात्र वॉरंट जारी

अमीषा ही मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसची स्टार प्रचारक होती

Bail warrant issued against actress Amisha Patel in Bhopal
अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात भोपाळमध्ये जामीनपात्र वॉरंट जारी

भोपाळ जिल्हा न्यायलयाकडून सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हिच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. UTF टेलीफिल्म प्रायव्हेट लिमिटेडने अमीषा पटेलवर ३२ लख २५ हजार रुपयांचा चेक बाउंस केल्याचा आरोप केला आहे. अमीषाला ४ डिसेंबरला जिल्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमीषा जिल्हा कोर्टात हजर राहिली नाही तर अमीषाविरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल,असे सांगण्यात आले आहे. UTF टेलीफिल्म प्रायव्हेट लिमिटेडचे वकील रवि पंथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम क्षेत्री जिल्हा न्यायधीश रवि कुमार बोरासी यांनी अमीषा पटेल विरोधात वॉरंट जारी केला आहे. अमीषा आणि तिची कंपनीM/S अमीषा पटेल प्रोडक्शनने UTF टेलीफिल्म प्रायव्हेट लिमीटेडकडून एक सिनेमा तयार करण्याच्या नावाखाली ३२ लाख २५ हजार रुपये उधार घेतले असल्याचे सांगितले आहे. अमीषा पटेल आणि UTF कंपनीत झालेल्या करारानुसार, कंपनीला दोन वेळा ३२ लाख २५ हजार रुपयांचे देण्यात आलेले दोन चेक बाउंस झाले.

 

अमीषा ही मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसची स्टार प्रचारक होती. भोपाळच नाही अमीषाच्या विरोधात इंदौरमध्ये देखील १० लाख रुपयांचा चेक बाउंस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचिकाकर्ते वकील नीतेश परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीषा पटेलने ६ महिन्यांआधी सिनेमा तयार करण्यासाठी इंदौर येथील निशा छीपा हिच्यातडून १० लाख रुपये रोख घेतले होते. त्याऐवजी २४ एप्रिल २०१९ तारखेचा चेक दिला होता मात्र निशाने हा चेक बँकेत दिल्यानंतर तो बाउंस झाला.

याआधी देखील अमीषाच्या विरोधात रांची कोर्टात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले होते. प्रोड्यूसर अजय कुमारने अमीषावर दीड कोटी रुपयांचा चेक बाउंस झाल्याचा आरोप केला होता. अजय कुमारने अमीषा देसी मॅजिक सिनेमा तयार करण्यासाठी ३ करोड रुपये दिले होते. काही दिवसांनी पैसे परत मागण्यासाठी गेल्यावर अमीषाने पैसे देण्यास नकार दिल्याने अजय कुमारने अमीषाविरोधात वॉरंट जारी केला होता.


हेही वाचा – kangna ranaut love : कंगनाच्या आयुष्यात ‘या’ व्यक्तीची एन्ट्री