‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ ठरली खास अवॉर्डची मानकरी, इंटरनेटवर फोटो व्हायरल

Bajrangi Bhaijaans Harshaali Malhotra dedicates Bharat Ratna Dr Ambedkar Award to Salman Khan, Kabir Khan
बजरंगी भाईजानची मुन्नी ठरली खास अवॉर्डची मानकरी, इंटरनेटवर फोटो व्हायरल

कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील सलमान खान, करीना कपूर व्यतिरिक्त जो चेहरा सर्वात चर्चेत राहिला तो म्हणजे हर्षाली मल्होत्रा हिचा. या चित्रपटात हर्षालीने ‘मुन्नी’ ही भूमिका साकारली होती. पण चित्रपटातील ही ‘मुन्नी’ अर्थात हर्षाली मोठी झाली असून तिचा चेहराही खूप बदलला आहे. नुकतेच हर्षाली मल्होत्रा हिला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्काराची मानकरी ठरल्याची माहिती खुद्द हर्षाली मल्होत्रा हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. हर्षालीने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारताना दिसतेय.

हा फोटो शेअर करत हर्षालीने कॅप्शनमध्य़े लिहिले की, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मी धन्य झाले. याचवेळी हर्षालीने तिच्या पुढील पोस्टमध्ये पुरस्कार हातात घेतलेले आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्य़े लिहिले की, हा पुरस्कार सलमान खान, कबीर खान, मुकेश छाबरा अंकल आणि बजरंगी भाईजानच्या संपूर्ण टीमला समर्पित आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. या फोटोंमध्ये हर्षाली खूपचं सुंदर दिसतेय.

सध्या तिचे सर्व फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहेत. बजरंगी भाईजान या सिनेमामुळे हर्षाली मल्होत्रा ​​हे नाव घराघरात पोहचले. 17 जुलै 2015 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यातच त्याच्या वाढदिवशी (27 डिसेंबर) सलमानने बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची घोषणा केली आणि त्याचे नाव पवनपुत्र भाईजान ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र बजरंगी भाईजानचा सीक्वलमध्ये हर्षालीची भूमिका असेल का याची कोणतीही अधिकृत माहिती नाही.


Corona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल