कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे मराठी मनावर अधिराज्य करणारे, मराठी माणसाला भुरळ घालणारे, व्यंगचित्रामधून आपले राजकीय मत मांडणारे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणारे ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट‘ठाकरे’. नक्की बघा येत्या 17 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता कलर्स मराठीवर.
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील एक सशक्त राजकीय नेतृत्व होते. त्यांची जीवनकथा, संघर्ष, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी केलेले योगदान या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तर अभिनेत्री अमृता राव हीने माँसाहेब मीनाताई ठाकरेंची प्रमुख भूमिका साकारली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण कानी पडलं की, अंगामध्ये नवे चैतन्य संचारायचे त्यांच्या आवाजातील जरब प्रत्येक माणसाला महाराष्ट्रीय असल्याचा गर्व देऊन जायची… कलाप्रेमी, व्यासंगी, आपल्या तेजस्वी प्रतिभेने, मदतीस धावून जाणार्या बाळासाहेबांनी मराठीच नव्हे तर इतर प्रांतियांचेही अलोट प्रेम मिळवले. धगधगत्या, ज्वलंत अशा चरित्रावर आधारित ‘ठाकरे’ नक्की बघा येत्या 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता! कलर्स मराठीवर.