Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आगामी फिक्शन क्राईम थ्रिलर 'बंबई मेरी जानचा' अॅक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज

आगामी फिक्शन क्राईम थ्रिलर ‘बंबई मेरी जानचा’ अॅक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज

Subscribe

‘अमेझॉन प्राईम व्हिडिओ’ ने आज त्याच्या आगामी फिक्शन क्राईम थ्रिलर ‘बंबई मेरी जानचा’ ट्रेलर रिलीज केला आहे. ‘रितेश सिधवानी’, ‘कासिम जगमगिया’ आणि ‘एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटचे’ ‘फरहान अख्तर’ निर्मित, ‘एस हुसैन झैदी’ यांच्या कथेसह, ‘बंबई मेरी जान’ची निर्मिती ‘रेन्सिल डिसिल्वा’ आणि ‘शुजात सौदागर’ यांनी केली आहे आणि शुजात सौदागर दिग्दर्शित आहे.

के के मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य आणि अमायरा दस्तूर यांसारख्या बहुमुखी आणि प्रतिभावान कलाकारांना एकाच छताखाली एकत्र आणते. ही मालिका चीनी, झेक, डॅनिश, डच, फिलिपिनो, फिनिश, ग्रीक, हिब्रू, हंगेरियन, इंडोनेशियन, कोरियन,  नॉर्वेजियन बोकमाल, रोमानियन, रशियन, स्वीडिश, थाई, युक्रेनियन आणि यासह अनेक परदेशी भाषांमध्ये उपशीर्षकांसह उपलब्ध होईल.

- Advertisement -

मेरी जानचा ट्रेलर प्रेक्षकांना 1970 च्या काल्पनिक बॉम्बेच्या रस्त्यावरून एका वेगवान, खडतर आणि गडद प्रवासात घेऊन जातो, जिथे टोळीयुद्ध, गुन्हेगारी आणि विश्वासघात सामान्य होते. या पार्श्वभूमीवर, ही काल्पनिक मालिका एका प्रामाणिक पोलिसाची मनमोहक कथा आहे.

- Advertisement -

आगामी मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना, ‘के के मेनन’ म्हणाले, “माझे पात्र इस्माईल कादरी हे बहुस्तरीय आणि अवघड आहे. तो एक प्रामाणिक पोलीस आणि दयाळू पिता आहे, जो परिपूर्णतेपासून दूर आहे. एकीकडे तो मुंबई शहराला सर्व प्रकारच्या गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याला शहरातील गुन्हेगारी सिंडिकेटचे प्यादे बनण्यास भाग पाडले आहे.

10 भागांची ही हिंदी मालिका 14 सप्टेंबर रोजी भारतातील प्राइम व्हिडिओवर आणि 240 देश आणि प्रदेशांमध्ये तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होईल.


हेही वाचा- ‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीत शाहरुखने मारली सनी देओलला मिठी; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -